चाकणमध्ये कामाचे पैसे मागितल्याने टोळक्‍याकडून मारहाण वडिलांना गाडीच्या बोनेटवरून ओढले

पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – चाकणमधील काळुस परिसरात कामाच्या बिलाचे पैसे मागितल्याच्या रागातून एका ड्रायव्हरला आणि त्याच्या मध्यस्थी करणाऱ्या मित्राला हॉकी स्टिकने बेदम मारहाण करण्यात आली. आरोपींनी फिर्यादीच्या वडिलांना कारच्या बोनेटवर १०० फूट फरफटत नेले. ही घटना रविवारी (दि. २६ एप्रिल) रोजी मध्‍यरात्री पावणे एक वाजताच्‍या सुमारास घडली आहे.
​या प्रकरणी अमोल आवटे, अजय बवले, निखिल खैरे, सत्यवान म्हसाडे, मारुती गव्हाणे आणि त्‍याचे दोन ते तीन साथीदार (नाव, पत्‍ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्‍या आरोपींची नावे आहे. अक्षय किसन डुंबरे (वय २२, रा. काळुस, ता. खेड) असे जखमीचे नाव असून त्‍यांनी रविवारी (दि. २६ एप्रिल) रोजी याबाबत चाकण उत्तर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षयने आरोपी सत्यवान म्हसाडे याच्याकडे कामाचे पैसे मागितले. याचा राग धरून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करत हॉकी स्टिकने मारहाण केली. वाद सोडवण्यासाठी आलेला शेखर पोटवडे हा देखील या मारहाणीत जखमी झाला. आरोपी पळून जात असताना अक्षयच्या वडिलांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी त्यांच्या अंगावर ‘फ्रॉन्स’ गाडी (MH 14 7655) घातली आणि त्यांना बोनेटवर सुमारे १०० फूट अंतरापर्यंत नेले, ज्यामुळे ते खाली पडून जखमी झाले. या प्रकरणाचा पुढील तपास चाकण पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *