पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – दत्तनगर, चिंचवड परिसरात पिस्टल आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी (दि. २७) दुपारी चारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी पोलीस नाईक आतीष शामराव कुडके यांनी सोमवारी (दि. २७ एप्रिल) रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी वैभव सुरेश माने (वय २९, रा. दत्तनगर, चिंचवड) याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वैभव माने हा ५१ हजार रुपये किमतीचे मॅगझिनसह देशी बनावटीचे पिस्टल आणि २ जिवंत काडतुसे बेकायदेशीरपणे बाळगताना आढळला. सध्या शहरात शस्त्रबंदी आदेश लागू असताना त्याने या आदेशाचा भंग केला आहे. या प्रकरणाचा तपास पिंपरी पोलीस करत आहेत.
चिंचवडमध्ये पिस्टलसह सराईताला अटक
