टेट्रा पॅक कंपनीतून ८ लाखांचे २३ लॅपटॉप चोरणारा अटकेत

पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – चाकण एमआयडीसीमधील ‘टेट्रा पॅक इंडिया’ या नामांकित कंपनीतून वेळोवेळी २३ लॅपटॉप चोरणाऱ्या कंपनीच्याच कर्मचा-यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही चोरी सप्टेंबर २०२४ ते जानेवारी २०२६ या काळात करण्यात आली होती.
​याप्रकरणी संजय सुदाम गाडे (वय ५४, रा. खेड) यांनी सोमवारी (दि. २७ एप्रिल) रोजी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी स्वप्नील सुनील पाटील (वय ३३, रा. बाणेर, पुणे) याला अटक केली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्वप्नील हा कंपनीत कामगार म्हणून कार्यरत होता. त्याने आपल्या पदाचा गैरफायदा घेऊन कंपनीच्या स्टोअरमधून ८ लाख ५ हजार रुपये किमतीचे ‘एचपी’ कंपनीचे २३ लॅपटॉप वेळोवेळी चोरून नेले. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्याने हा गुन्हा केला. पोलीस उपनिरीक्षक परदेशी या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *