pimpri chinchwad crime-देहूरोड येथे भाजपच्या सक्रिय कार्यकर्त्यावर गोळीबार.

भाजपा कार्यकर्ते रमेश रेड्डी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला असून यात नऊ राऊंड फायर केले तर यातील एक गोळी रमेश रेड्डी यांच्या मस्तकाला भेदून गेल्याने त्याना जखमी अवस्थेत देहूरोडच्या आधार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं.

उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

ह्या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता, तर रमेश रेड्डी यांच्या नातेवाईक आणि मित्र परिवाराकडून जुना पुणे मुंबई महामार्ग जाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

पण देहूरोड पोलिसांच्या हस्तक्षेप नंतर रमेश रेड्डी यांचा मृतदेह पिंपरी चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात हलविण्यात आला.

रमेश रेड्डीवर झालेल्या हल्ल्याचे कारण अस्पष्ट असून देहूरोड पोलीस अधिक तपास करत आहेत.

गोळीबाराच्या घटनेनंतर देहूरोड बाजारपेठेतील दुकाने बंद करण्यात आली असून पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *