चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलाकडून पिस्तुल जप्त; मध्य प्रदेशातील आरोपीवर गुन्हा

पिंपरी, दि. 29 (प्रतिनिधी) – वाल्हेकरवाडी परिसरात एका अल्पवयीन मुलाला बेकायदेशीर पिस्तुल बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या मुलाने हे शस्त्र मध्य प्रदेशातील एका व्यक्तीकडून आणल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.
रामसिंग (रा. सेंधवा, मध्य प्रदेश) आणि एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे. चिंचवड पोलीस ठाण्यातीले पोलीस हवाल्दार अविनाश प्रकाश गायकवाड यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हसोबा मंदिराच्या मागे मोकळ्या जागेत एक मुलगा शस्त्र घेऊन थांबल्याची माहिती मिळाली होती. त्याच्या झडतीत 55 हजार रुपये किमतीचे पिस्तुल आणि 4 हजार रुपयांची दोन जिवंत काडतुसे सापडली. चौकशीत त्याने हे शस्त्र मध्य प्रदेशातील रामसिंगकडून आणल्याचे सांगितले. चिंचवड पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *