भोसरीत पिस्तुलासह तरुणास अटक

पिंपरी, दि. 29 (प्रतिनिधी) – भोसरी परिसरात बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगणार्‍या एका तरुणाला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. सोमवारी रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास राजमाता कॉलेजच्या पाठीमागील मोकळ्या जागेत ही कारवाई करण्यात आली.
ऋषिकेश सुनील घोरपडे (वय 20, रा. गोडाऊन चौक, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस शिपाई वैभव पुरुषोत्तम वाटकर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लांडेवाडी येथील राजमाता कॉलेजच्या पाठीमागे मोकळ्या जागेत अंधारात आरोपी संशयास्पदरीत्या थांबला असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी धाड टाकली असता त्याच्याकडे 26 हजार रुपये किमतीचे पिस्तुल आणि काडतूस आढळून आले. पोलीस आयुक्तांच्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. भोसरी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *