पिंपरी, दि. 29 (pimpri chinchwad crime) – आकुर्डीतील दत्तवाडी परिसरात अंमली पदार्थ गांजा बाळगणार्या एका 21 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 28 एप्रिल) रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास करण्यात आली.
प्रेम अतुल पवार (वय 21, रा. खराळवाडी, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस शिपाई विशाल रंगनाथ म्हस्के यांनी मंगळवारी (दि. 28 एप्रिल) रोजी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्सुला शाळेच्या पाठीमागे सार्वजनिक रस्त्याजवळ आरोपी संशयास्पदरीत्या थांबला होता. त्याची तपासणी केली असता, त्याच्याकडे 12 हजार 105 रुपये किमतीचा 269 ग्रॅम गांजा आढळून आला.
पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त केला असून निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
