पिंपरी, दि. 29 (pimrpi chinchwad crime) – मोशी परिसरात आपल्या कमरेला तलवार लावून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिरणार्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 28 एप्रिल) रोजी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास करण्यात आली.
ऋषिकेश पांडुरंग वानखेडे (वय 19, रा. शिवाजीवाडी, मोशी) असे आरोपीचे नाव आहे. पोलीस शिपाई नितीन आप्पा खेसे यांनी मंगळवारी (दि. 28 एप्रिल) रोजी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोशी येथील नवीन 90 फुटी रोडवर खडी मशीनकडे जाणार्या रस्त्याच्या कडेला आरोपी ऋषिकेश हा शर्टाच्या आत कमरेला लोखंडी तलवार लावून उभा होता.
पोलीस आयुक्तांच्या शस्त्रबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
