पिंपरी, दि. ३० (प्रतिनिधी) – आधीच विक्री केलेल्या जमिनीची सात जणांनी
मिळून पुन्हा विक्री करून शेतकर्याची १५ लाख ६५ हजारांची फसवणूक केली. ही घटना खेड तालुक्यातील रासे येथे घडली.
दिगंबर चंद्रकांत लोणारी (वय ४९, रा. भोसे, ता. खेड) यांनी चाकण
दक्षिण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. योगेश
एकनाथ शिंदे, देविदास एकनाथ्ा शिंदे, सोमनाथ तुकाराम टोपे आणि विजय
ज्ञानोबा शिंदे (सर्व रा. भोसे, ता. खेड) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. खेड तालुक्यातील रासे येथील
जमीन आधीच विक्री झालेली असतानाही आरोपींनी ती माहिती लपवून पुन्हा
व्यवहार केला. २०१६ मध्ये फिर्यादीकडून १६ लाख ६५ हजार रोख व
धनादेशाद्वारे स्वीकारून फसवणूक केली. चाकण दक्षिण पोलीस तपास करीत आहेत.
विकलेल्या जागेचा व्यवहार करून १५ लाखाची फसवणूक
