तडीपार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

पिंपरी, दि. 1 (प्रतिनिधी) – पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेला एक सराईत बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. त्याच्याकडून गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 30 एप्रिल रोजी दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास मावळ तालुक्यातील वराळे येथे करण्यात आली आहे.
पोलीस शिपाई रमेश सोमीनाथ घुले यांनी गुरुवारी (दि. 30 एप्रल) रोजी याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अनिल जगन जाधव (वय 26 वर्षे, रा. वराळे, मावळ) याला अटक केली आहे. आरोपी जाधव याला सप्टेंबर 2025 मध्ये संपूर्ण पुणे जिल्हा आणि खालापूर तालुक्यातून 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. असे असतानाही तो वराळे-आंबी रोड परिसरात बेकायदेशीरपणे शस्त्र घेऊन फिरताना मिळून आला. मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार मरागजे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *