ट्रकच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी
पिंपरी, दि. 1 (प्रतिनिधी) – सावरदरी येथील बेलराईस इंडस्ट्रीजजवळ ट्रकने दिलेल्या धडकेत एक 52 वर्षीय पादचारी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (दि. 29 एप्रिल) रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास घडली आहे.
याप्रकरणी संतोष अशोक मिरेवाड (वय 23, रा. हडपसर, पुणे) यांनी गुरुवारी (दि. 30 एप्रिल) रोजी उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी ट्रक चालक जाकर छोटा (वय 46, रा. राजस्थान) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीचे वडील अशोक गणपत मिरेवाड (वय 52 वर्षे) हे कामावर जात असताना, आरोपीने आपल्या ताब्यातील ट्रक बेदरकारपणे चालवून त्यांना धडक दिली. या अपघातात अशोक मिरेवाड यांच्या पायाला आणि कमरेला गंभीर दुखापत झाली असून त्यांचे हाड फॅक्चर झाले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार शाकापुरे करीत आहेत.