गांजा ओढताना तिघांना रंगेहात पकडले

पिंपरी, दि. 1 (प्रतिनिधी) – सार्वजनिक बागेत गांजाचे सेवन करणार्‍या तीन तरुणांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 30 एप्रिल) रोजी दुपारी सव्वादोन वाजताच्या सुमारास संत तुकाराम नगर, पिंपरी येथे करण्यात आली आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस शिपाई सुभाष राजेंद्र गुरव यांनी गुरुवारी (दि. 30 एप्रिल) रोजी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कुणाल बसवराज चमड्डेरी (वय 24), सेफ अब्बास सय्यद (वय 21) आणि जॉश्वा राजेश नायर (वय 20) यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संत तुकाराम नगर येथील मनपा गार्डनमध्ये हे तिघे जण सिमेंटच्या बाकावर बसून प्लास्टिकच्या चिलिममधून गांजा ओढत असताना पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दिवटे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *