चर्‍होलीत गुटखा विक्री करणार्‍या तीन पानशॉपवर छापा

पिंपरी, दि. 1 (प्रतिनिधी) – चर्‍होली बुद्रुक परिसरात प्रतिबंधित सुगंधी सुपारी आणि पानमसाल्याची साठवणूक व विक्री करणार्‍या तीन पानशॉपवर अन्न व औषध प्रशासनाने छापे टाकला आहेत. या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास करण्यात आली आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी अक्षय मधुकर शेळके, समृद्धी नितीन चव्हाण आणि प्रशांत शिवरात चव्हाण यांनी गुरुवारी (दि. 30 एप्रिल) रोजी तीन वेगवेगळे गुन्ह्यांची फिर्याद दिघी पोलीस ठाण्यात दिली आहे. दत्तात्रय बन्सी काळे (वय 55, सुदामा पानशॉप), सुरज संजय गव्हाणे (वय 26, राहुल पानशॉप) आणि क्षितीज शिवाजी गावडे (वय 25, सावकार पानशॉप) यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. या पानशॉपमधून राजनिवास, विमल, आरएमडी, तंबाखू आणि मावा यांसारखे शासनाने बंदी घातलेले पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव, शिंदे आणि जगताप करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *