मोबाइल चार्जिंगच्या कारणावरून मोशीत पती-पत्नीला बेदम मारहाण

​पिंपरी, दि. २ (प्रतिनिधी) – मोबाइल चार्जिंगला लावण्याच्या किरकोळ कारणावरून चौघांनी मिळून पती-पत्नीला लाकडी बांबू आणि दगडाने बेदम मारहाण केली. ही घटना मोशी येथील बोऱ्हाडेवाडी येथे शुक्रवारी (दि. १ मे) रोजी घडली आहे.
​याप्रकरणी साधु साहेबराव फुलमाळी (वय ३५, रा. वामदरी, ता. श्रीगोंदा, सध्या रा. मोशी) यांनी शुक्रवारी (दि. १ मे) रोजी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी रावसाहेब माणिक काकडे (वय २८), लक्ष्मण रामा फुलमाळी (वय २२), संजय आप्पा गायकवाड (वय १९) आणि विकास शिवराम गजरे (वय २३, सर्व रा. मोशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ मे रोजी रात्री १:३० च्या सुमारास फिर्यादी त्यांचा मोबाइल एका लाईटच्या खांबाला चार्जिंगसाठी लावत होते. याचा राग धरून आरोपींनी संगनमत करून फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी, बांबूने आणि दगडाने मारहाण केली. तसेच त्यांच्या पत्नीलाही बांबूने मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादीच्या हाताचे हाड फॅक्चर झाले आहे. पोलीस उपनिरीक्षक खडसे या प्रकरणाचा तपास करत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *