टँकर चालकाची दादागिरी; दुचाकीची तोडफोड करीत चालकाला मारहाण; देहूरोड येथील घटना

पिंपरी, दि. २ (प्रतिनिधी) – रस्त्यावरून जाताना वाहन पुढे नेण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका टँकर चालकाने तरुण दुचाकीस्वाराला लोखंडी पाइपने मारहाण करून जखमी केले. तसेच दुचाकीचीही तोडफोड केली. ही घटना तळवडे-चिखली रोडवर बुधवारी (दि. २९ एप्रिल) रोजी रात्री आठ वाजताच्‍या सुमारास घडली.
ओम पुरुषोत्तम तरटे (वय २१, रा. पाटील नगर, चिखली) असे जखमी तरुणाचे नाव असून त्‍यांनी शुक्रवारी (दि. १ मे) रोजी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी टँकर चालक श्रवण रामदास हगवणे (वय २१) याच्यावर गुन्हा दाखल करून नोटीस बजावली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ एप्रिल रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास फिर्यादी आपल्या दुचाकीवरून घरी जात होते. यावेळी रस्त्यात गाडी पुढे घालण्याच्या कारणावरून टँकर चालकाशी त्यांचा वाद झाला. आरोपीने रागाच्या भरात हातातील पोकळ लोखंडी पाईपने फिर्यादीच्या दुचाकीच्या टाकीवर मारून नुकसान केले आणि फिर्यादीच्या डाव्या हातावर प्रहार करून त्यांना जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक जाधव या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *