भोसरीतील तरुणाची पावणेदोन लाखांची फसवणूक

​पिंपरी, दि. ६ (प्रतिनिधी) – बँकेतून बोलत असल्याचे सांगून सायबर चोरट्यांनी एका तरुणाला लिंक पाठवून त्याच्या क्रेडिट कार्डमधून एक लाख ९० हजार ४६६ रुपये लंपास केले आहेत. ही घटना २० फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत एमआयडीसी भोसरी येथे घडली.
​याप्रकरणी मोबाइल नंबर ८२४०३०९९२४ वरील एका अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका पुरुष फिर्यादीने मंगळवारी (दि. ५ मे) रोजी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्‍यात तक्रार दिली आहे.
​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजताच्‍या सुमारास आरोपी महिलेने फिर्यादीला फोन करून आयसीआयसीआय बँकेतून बोलत असल्याची बतावणी केली. क्रेडिट कार्ड प्रोटेक्शन प्लॅन संपत असल्याचे सांगून तिने व्हॉट्सॲपवर एक लिंक पाठवली. ती लिंक उघडताच फिर्यादीच्या आरबीएल बँक क्रेडिट कार्डमधून एक लाख ९० हजार ४६६ रुपये डेबिट झाले. पोलीस उपनिरीक्षक मिसाळ या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *