चिंचवडमध्ये दुचाकी अपघातात चालकाचा मृत्यू

पिंपरी, दि. ६ (प्रतिनिधी) – चिंचवड येथील मदर टेरेसा ब्रिजवर भरधाव वेगातील दुचाकी घसरून झालेल्‍या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. ५ मे) रोजी पहाटे तीन वाजताच्‍या सुमारास घडली.
​आदित्य बसलिंगप्पा मेटी (सध्‍या रा. हडपसर. मूळ रा. कोंबडपाडा, पेण, रायगड) असे अपघातात मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार कृष्णदेव सुरेश बनसोडे (वय ३४), यांनी चिंचवड पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत आदित्य मेटी हा आपली ॲक्टिव्हा दुचाकी (MH-06-BK-7582) घेऊन मदर टेरेसा ब्रिजवरून भरधाव वेगाने जात होता. वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याने त्याची गाडी घसरली. या अपघातात यांच्‍या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याचा मृत्यू झाला. चिंचवड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दुधे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *