pimpri chinchwad crime-चिखलीत पैशांच्या वादातून तरुणाला रॉडने मारहाण

पिंपरी, दि. 7 (pimpri chinchwad) – जुन्या व्यवहाराचे पैसे मागितल्याच्या रागातून एका तरुणाला लोखंडी रॉडने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली.

ही घटना मंगळवारी (दि. 5 मे) रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास चिखली परिसरातील कुदळवाडी येथील रविरंजन वजन काट्यामागील एका दुकानात घडली.

मुस्ताक चौधरी, इरशाद चौधरी, मुमताज चौधरी आणि फिरोज चौधरी (सर्व रा. कुदळवाडी, चिखली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अफताब आलम अब्दुल मन्नान शेख (वय 28, रा. कुदळवाडी, चिखली) यांनी बुधवारी (दि. 6) याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अफताब हे आरोपी मुस्ताक चौधरी याच्याकडे व्यवहाराचे राहिलेले पैसे मागण्यासाठी गेले होते.

त्यावेळी आरोपीने पैसे देण्यास नकार देत शिवीगाळ केली. वादाचे रूपांतर भांडणात झाल्यावर आरोपींनी संगनमत करून अफताब यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

तसेच इरशाद चौधरी याने लोखंडी रॉडने अफताब यांच्या डोक्यात व गळ्यावर प्रहार करून त्यांना गंभीर जखमी केले.

चिखली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *