Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

pimpri chinchwad-​पावसाळ्यापूर्वी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सज्ज; आयुक्तांकडून ‘ॲक्शन प्लॅन’ जाहीर

By Sumedh Chapalgaonkar
May 7, 2026 2 Min Read
0

(pimpri chinchwad)-पावसाळ्यापूर्वी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सज्ज; आयुक्तांकडून ‘ॲक्शन प्लॅन’ जाहीर

​नालेसफाई आणि धोकादायक होर्डिंग्जवर आयुक्तांचा कडक इशारा; आपत्ती निवारणासाठी ‘क्विक रिस्पॉन्स टीम’ तैनात

​पिंपरी-चिंचवड :
येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने कंबर कसली आहे. शहरात कुठेही पाणी साचणार नाही याची दक्षता घेण्याचे स्पष्ट आदेश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. “पावसाळ्यापूर्वी सूक्ष्म नियोजन करा आणि आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवा,” अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

​पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात गुरुवारी मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी आयुक्तांनी शहरातील विविध विभागांच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला.
​पाणी साचणाऱ्या जागांवर ‘वॉच’
​शहरात ज्या ठिकाणी दरवर्षी पावसाचे पाणी साचते, अशा ठिकाणांची तातडीने ओळख पटवा. तिथे कायमस्वरूपी उपाययोजना करा. नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण झालीच पाहिजेत. पावसाळ्यापूर्वी शहराची जलनिस्सारण यंत्रणा सक्षम करा, असे आदेश आयुक्तांनी दिले. नदीकाठच्या पूरप्रवण भागातील नागरिकांच्या स्थलांतराचे नियोजन आतापासूनच पूर्ण करण्याचे त्यांनी बजावले.

​होर्डिंग्ज आणि धोकादायक इमारतींवर कारवाई
​शहरातील अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंग्ज तत्काळ काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. होर्डिंगधारकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल. तसेच, धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून तेथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

​आरोग्य आणि रुग्णालय व्यवस्था
​पावसाळ्यात साथीचे रोग पसरू नयेत म्हणून आरोग्य विभागाने आत्तापासूनच सतर्क राहावे. सर्व भागांत नियमित फवारणी आणि धुरीकरण करावे. महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये अखंडित वीज पुरवठा असावा. आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णालयांत पुरेसे बेड आरक्षित ठेवावेत, असेही आयुक्त म्हणाले.
​’क्विक रिस्पॉन्स टीम’ची स्थापना
​पावसाळ्यात झाडपडीच्या घटना किंवा पाणी साचल्यास तातडीने मदत पोहचवण्यासाठी ‘क्विक रिस्पॉन्स टीम’ (QRT) कार्यरत राहतील. यात अग्निशमन, आरोग्य, विद्युत आणि उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. रस्त्यांवरील खड्डे पावसाळ्यापूर्वी बुजवून वाहतूक सुरळीत ठेवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

​फुटपाथ होणार अतिक्रमणमुक्त
​या बैठकीत ‘अतिक्रमणमुक्त फुटपाथ’ पंधरवड्याचाही आढावा घेण्यात आला. पादचाऱ्यांचे मार्ग मोकळे ठेवण्यासाठी कोणत्याही दबावाला बळी न पडता कठोर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले.

​बैठकीस उपस्थित प्रमुख अधिकारी:
या महत्त्वपूर्ण बैठकीला अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सहआयुक्त मनोज लोणकर, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, वायसीएमचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, उपआयुक्त संदीप खोत, सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे आणि मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Tags:

Pimpri Chinchwad Municipal Corporation Ready Ahead of Monsoon; Commissioner Announces Action Plan
Author

Sumedh Chapalgaonkar

Follow Me
Other Articles
Previous

निगडी येथे भटक्या गायीला पोलिस व्हॅन ची जोरदार धडक , गाय गंभीर जखमी , व्हॅन चे हि नुकसान

Next

pimpri chinchwad crime-चिखलीत पैशांच्या वादातून तरुणाला रॉडने मारहाण

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • Mumbai-मुंबईत अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन; जिमी बॉयशी संबंधित बेकरीसह पाच बेकऱ्यांचे परवाने निलंबित
  • Pimpri-Chinchwad-निगडी डेपोतील ई-बस सेवेचा बोजवारा; ऐनवेळी फेऱ्या रद्द, प्रवाशांची रोजची फरफट वारंवार तांत्रिक बिघाडांमुळे वाहतूक विस्कळीत; माहिती व्यवस्थेचाही फज्जा, नोकरदार-विद्यार्थ्यांचा संताप वाढला
  • Jerusalem-वेस्ट बँकमध्ये हिंसाचार भडकला; इस्रायली सैनिक आणि पॅलेस्टिनी नागरिकांमध्ये चकमक, सहा जणांचा मृत्यू
  • Mumbai-स्टुडंट प्रोटेस्टदरम्यान आकांक्षा पुरीचा मोठा दावा; ‘आंदोलनाचे मार्केटिंग करू नका, आम्हालाही संपर्क केला जात आहे’
  • Pandharpur-आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा; पंढरपूर कॉरिडॉर अडीच वर्षांत पूर्ण करण्याचा निर्धार

CATEGORIES

  • Uncategorized (460)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (880)
  • पुणे (135)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • Mumbai-मुंबईत अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन; जिमी बॉयशी संबंधित बेकरीसह पाच बेकऱ्यांचे परवाने निलंबित
  • Pimpri-Chinchwad-निगडी डेपोतील ई-बस सेवेचा बोजवारा; ऐनवेळी फेऱ्या रद्द, प्रवाशांची रोजची फरफट वारंवार तांत्रिक बिघाडांमुळे वाहतूक विस्कळीत; माहिती व्यवस्थेचाही फज्जा, नोकरदार-विद्यार्थ्यांचा संताप वाढला
  • Jerusalem-वेस्ट बँकमध्ये हिंसाचार भडकला; इस्रायली सैनिक आणि पॅलेस्टिनी नागरिकांमध्ये चकमक, सहा जणांचा मृत्यू
July 25, 2026

Mumbai-मुंबईत अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन; जिमी बॉयशी संबंधित बेकरीसह पाच बेकऱ्यांचे परवाने निलंबित

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : अन्नसुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मुंबईतील मोठी कारवाई...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

Pimpri-Chinchwad-निगडी डेपोतील ई-बस सेवेचा बोजवारा; ऐनवेळी फेऱ्या रद्द, प्रवाशांची रोजची फरफट वारंवार तांत्रिक बिघाडांमुळे वाहतूक विस्कळीत; माहिती व्यवस्थेचाही फज्जा, नोकरदार-विद्यार्थ्यांचा संताप वाढला

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी- चिंचवड : पर्यावरणपूरक आणि आधुनिक सार्वजनिक वाहतुकीचा चेहरा म्हणून सुरू करण्यात आलेली पीएमपीएमएलची ई-बस...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

Jerusalem-वेस्ट बँकमध्ये हिंसाचार भडकला; इस्रायली सैनिक आणि पॅलेस्टिनी नागरिकांमध्ये चकमक, सहा जणांचा मृत्यू

Sumedh Chapalgaonkar

जेरुसलेम : पॅलेस्टिनी बहुल वेस्ट बँकमधील नाब्लूसजवळील ताल गावात इस्रायली सैनिक, ज्यू वसाहतवादी (सेटलर्स) आणि...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

Mumbai-स्टुडंट प्रोटेस्टदरम्यान आकांक्षा पुरीचा मोठा दावा; ‘आंदोलनाचे मार्केटिंग करू नका, आम्हालाही संपर्क केला जात आहे’

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : बिग बॉस ओटीटी फेम अभिनेत्री आकांक्षा पुरी हिने सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

Pandharpur-आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा; पंढरपूर कॉरिडॉर अडीच वर्षांत पूर्ण करण्याचा निर्धार

Sumedh Chapalgaonkar

पंढरपूर : आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक तसेच मानाचे वारकरी बाबासाहेब माधव...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

Delhi-आंदोलनस्थळी जाऊ शकला नाही, पण पाठवले १५० पिझ्झा! नागालँडच्या तरुणाच्या कृतीची देशभर चर्चा

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली : दिल्लीतील जंतर-मंतरवर नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असतानाच नागालँडमधील एका तरुणाने...

Read More
July 25, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme