पिंपरी, दि. 7 (pimpri chinchwad) – जादा परताव्याचे आमिष दाखवून 25 लाख रुपये गुंतवणूक करून घेवून फसवणूक केल्याप्रकरणी महिरा ग्रुपच्या मालकीणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2017 पासून हा फसवणुकीचा प्रकार सुरू होता.
डॉ. नोहेरा शेख (वय 42, रा. हैद्राबाद, तेलंगणा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलीम लालमोहंमद हन्नूरे (वय 52, रा. मोरवाडी, पिंपरी) यांनी बुधवारी (दि. 6) संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 22 नोव्हेंबर 2017 ते 6 मे 2026 या कालावधीत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या वडिलांनी हिरा ग्रुपमध्ये वार्षिक 36 टक्के परतावा मिळेल या आमिषाने 25 लाख रुपये गुंतवले होते. सुरुवातीला त्यांना 79 हजार रुपये परतावा मिळाला, मात्र त्यानंतर रक्कम परत मिळाली नाही.
आरोपीला 2018 मध्ये अशाच प्रकारच्या गुन्ह्यांत अटक झाली होती, त्यानंतर जामिनावर सुटल्यावर त्यांनी पैसे परत करण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र, अद्याप रक्कम न मिळाल्याने अखेर तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक गाडेकर या प्रकरणाचा तपास करत आहेत.
