pimpri chinchwad crime-पिंपरीमध्ये 572 ग्रॅम गांजासह एकाला अटक; अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

पिंपरी, दि. 7 (pimpri chinchwad crime) – पिंपरीतील अशोकनगर परिसरात बेकायदेशीररीत्या गांजा विक्रीसाठी बाळगणार्‍या एका तरुणाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. बुधवारी (दि. 6 मे) रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास म्हसोबा मंदिराजवळील मोकळ्या जागेत ही कारवाई करण्यात आली.

अभिषेक उत्तम कांबळे (वय 25, रा. बौद्धनगर, पिंपरी) याला अटक करण्यात आली असून, गिता मलकेकर (रा. भाटनगर, पिंपरी) या महिलेवरही गुन्हा दाखल केला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस शिपाई संतोष सपकाळ यांनी बुधवारी (दि. 6 मे) रोजी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभिषेककडे 28 हजार 600 रुपये किमतीचा 572 ग्रॅम गांजा, एक मोबाइल आणि रोख रक्कम असा एकूण 48 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे.

हा गांजा त्याने गिता मलकेकर हिच्याकडून विक्रीसाठी आणल्याचे तपासात समोर आले आहे. पिंपरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लोखंडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *