पिंपरी, दि. ९ (प्रतिनिधी) – मोबाइलमधील रेकॉर्डिंगवरून झालेल्या वादात ठेकेदाराने एका तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. त्यानंतर सासरकडील आरोपींनी फिर्यादीच्या पत्नीला धमकावून जबरदस्तीने सोबत नेले. ही घटना भोसरीतील मधुबन सोसायटीत २७ एप्रिल २०२६ रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली आहे.
याप्रकरणी ठेकेदार यादव (वय ५५, रा. चिखली), प्रकाश बाळू उंबरे (वय २३) आणि योगेश बाळू उंबरे (वय २८, दोघे रा. भोसरी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. विनायक चिंतामण घोडे (वय ३५, रा. मधुबन सोसायटी, भोसरी) यांनी शुक्रवारी (दि. ८ मे) रोजी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विनायक यांनी त्यांच्या पत्नीच्या मोबाइलमध्ये आरोपी ठेकेदार यादवसोबतच्या संभाषणाचे रेकॉर्डिंग ऐकले होते. त्याबाबत विचारणा केली असता पत्नीने आपले आई, वडिल, भोऊ आणि ठेकेदार यादरव यांना घरी बोलविले. त्यानुसार ठेकेदार यादव आणि पत्नीचे दोन भाऊ फिय्रादी विनायक यांच्या घरी आले. आरोपींनी विनायक यांना लाकडी दांडक्याने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच ‘पुण्यात राहायचे असेल तर माझया बहिणीला त्रास द्यायचा नाही’ अशी धमकी देऊन ते विनायक यांच्या पत्नीला घेऊन गेले. भोसरी पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
भोसरीत पतीला लाकडी दांडक्याने मारहाण करून पत्नीला पळवून नेले
