निगडीत तडीपार गुंडाला गावठी कट्ट्यासह अटक

पिंपरी, दि. ९ (प्रतिनिधी) – पोलीस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन करून शहरात वावरणाऱ्या एका तडीपार गुंडाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातून एक गावठी कट्टा आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई शुक्रवारी (दि. ८ मे) रोजी मध्‍यरात्री पावणे एक वाजताच्‍या सुमारास करण्‍यात आली आहे.
​करण उर्फ राजू ज्ञानदेव तिरकर (वय २३, रा. अजंठानगर, चिंचवड) असे गुन्‍हा दाखल केल्‍यानंतर अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस शिपाई विकास रेड्डी यांनी शुक्रवारी (दि. ८ मे) रोजी या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तिरकर याला ७ जानेवारी २०२६ रोजी दोन वर्षांसाठी पिंपरी-चिंचवड, पुणे शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. ८ मे रोजी पहाटेच्या सुमारास तो अजंठानगर येथील आयटीआय जवळ कोणताही परवाना नसताना ५० हजार रुपये किमतीचा देशी बनावटीचा कट्टा आणि १,५०० रुपयांची तीन काडतुसे घेऊन फिरताना आढळला. ​निगडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *