जमीन मोजणीच्या वादातून एकाला बेदम मारहाण

पिंपरी, दि. १२ (प्रतिनिधी) – मावळ तालुक्यातील बेबड ओहळ येथे जमीन मोजणीच्या कारणावरून झालेल्या वादात एका व्यक्तीला काठी आणि दगडाने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना सोमवारी (दि. ४ मे) रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास बेबड ओहळ येथे घडली.
याप्रकरणी भूषण बबनराव जगताप (वय ४०, रा. बेबड ओहळ, ता. मावळ, जि. पुणे) यांनी सोमवारी (दि. ११ मे) रोजी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दत्ता भीका सावंत, माया दत्ता सावंत आणि धीरज दत्ता सावंत (सर्व रा. बेबड ओहळ, ता. मावळ, जि. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या मालकीच्या जमिनीच्या मोजणीवरून आरोपींनी त्यांच्याशी वाद घातला. आरोपींनी भूषण यांच्या अंगावर धावून जात त्यांना हाताने, काठीने आणि दगडाने मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादीच्या नाकाचे हाड आणि पायाला गंभीर दुखापत झाली. तसेच आरोपींनी फिर्यादीच्या आई-वडील आणि काका-काकींना जीवे मारण्याची धमकी दिली. शिरगाव पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *