पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – चुकीने दुसऱ्याच्या खात्यात गेलेले पैसे परत मिळवून देण्याच्या बहाण्याने एका महिलेचे बँक खाते हॅक करून ६ लाख ८७ हजार रुपये चोरल्याचा प्रकार चिंचवडमध्ये घडला आहे. ही घटना ९ एप्रिल ते १३ एप्रिल २०२६ दरम्यान चिंचवड येथे घडली.
याप्रकरणी राजीव गुप्ता याच्यासह बंधन बँक, कॅनरा बँक, आयडीबीआय बँक आणि एनएसडीएल बँक खातेधारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिला फिर्यादीने मंगळवारी (दि. १२ मे) रोजी चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने आपल्या मित्राला पैसे पाठवताना ते नजरचुकीने दुसऱ्याच्या खात्यात जमा झाले होते. ते पैसे परत मिळवण्यासाठी त्यांनी बँकेच्या कस्टमर केअरला फोन केला असता, आरोपींनी आम्ही बँकेतून बोलत असल्याचे भासवून त्यांना विश्वासात घेतले. व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलद्वारे फिर्यादीचा मोबाईल हॅक करून आणि ओटीपी देण्यास भाग पाडून आरोपींनी फिर्यादीची आयसीआयसीआय आणि एचडीएफसी बँक खाती हॅक केली. त्यातून एकूण सहा लाख ८७ हजार रुपये काढून घेऊन आरोपींनी फसवणूक केली. चिंचवड गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रणजित जाधव या प्रकरणाचा तपास करत आहेत.
चिंचवडमध्ये बँक खाते हॅक करून महिलेची सात लाखांची फसवणूक
