पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – क्रेडिट कार्डची माहिती चोरून अज्ञात व्यक्तीने हिंजवडी येथील एकाची दोन लाख रुपयांची फसवणूक केली आहे. ही घटना ३ मे २०२६ रोजी दुपारी हिंजवडी फेज ३ येथील इवॉन होम्स सोसायटीमध्ये घडली.
याप्रकरणी पुरूष फिर्यादीने यांनी मंगळवारी (दि. १२ मे) रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ मे रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास फिर्यादी हे आपल्या राहत्या घरी असताना अज्ञात इसमाने त्यांच्या आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डची माहिती मिळवून दोन ऑनलाइन ट्रान्झॅक्शन केले. यामध्ये ‘बुक माय शो’चे गिफ्ट कार्ड्स खरेदी करून एकूण दोन लाख रुपयांचा अपहार करण्यात आला. फिर्यादीने यापूर्वी सायबर पोर्टलवर तक्रार केली होती, त्यावरून आता हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
हिंजवडीत क्रेडिट कार्डचा वापर करून दोन लाखांची ऑनलाइन फसवणूक
