दिनांक 25 व 26 मे 2026 रोजी All India State Bank of India Staff Federation यांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपाला State Bank Workers Organisation ने जाहीर विरोध केला आहे. State Bank Workers Organisation ही संघटना National Organisation of Bank Workers (NOBW) तसेच Bharatiya Mazdoor Sangh यांच्याशी संलग्न आहे.
स्टेट बँक कर्मचाऱ्यांच्या असंख्य प्रलंबित मागण्या व महत्त्वाचे प्रश्न संपाच्या मागण्यांमध्ये समाविष्ट करण्यात आले नसल्यामुळे संघटनेने हा विरोध दर्शविला असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस Rajesh Mulay यांनी दिली.
ज्या आऊटसोर्सिंग धोरणाला संबंधित फेडरेशनने पूर्वी स्टेट बँक व्यवस्थापनाशी करार करून मान्यता दिली, त्याच आऊटसोर्सिंगच्या विरोधात आता संप पुकारणे ही दिशाभूल करणारी भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच पाच दिवसांचा बँकिंग आठवडा, केआरए/सीडीएसचे गेल्या वर्षापासून प्रलंबित असलेले पेमेंट, अधिकारी व कर्मचारी यांच्यातील सुविधांमधील असमानता, कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित सेवा-सुविधा तसेच इतर अनेक महत्त्वाच्या प्रश्नांचा संपाच्या मागण्यांमध्ये समावेश करण्यात आलेला नसल्याबद्दल संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
State Bank Workers Organisation ने घेतलेल्या या भूमिकेला State Bank of India मधील विविध स्तरांवरील कर्मचारी व सदस्यांकडून मोठा पाठिंबा मिळत असल्याचेही श्री. राजेश मुळे यांनी सांगितले. त्यामुळे संपाला अपेक्षित प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमी असून, हा संप न होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
