पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – कमी किमतीत म्हाडाचे फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची २० लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना २०२३ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत चिंचवड येथे घडली.
याबाबत ४० वर्षीय पीडित महिलेने रविवारी (दि. १७ मे) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार उमाकांत डाके (वय ६०), शुभम उमाकांत डाके (वय २९) आणि एक महिला (वय ५६, सर्व रा. साहील रेसिडेन्सी, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून फिर्यादीला डांगे चौक येथील एका सोसायटीमध्ये म्हाडाचे दोन फ्लॅट कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी फिर्यादीकडून २० लाख ८५ हजार रुपये घेतले, मात्र त्यांना फ्लॅट दिला नाही आणि पैसेही परत केले नाहीत. चिंचवड पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
म्हाडाचे फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून २१ लाखांची फसवणूक
