पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या मागे असलेल्या मोकळ्या मैदानात झोपलेल्या एका तरुणाचा मोबाईल आणि चांदीचे ब्रेसलेट चोरट्याने लंपास केले. ही घटना रविवारी (दि. १७ मे) रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
अनिकेत सुधाकर सोनवणे (वय २७, रा. बोपोडी, पुणे) यांनी सोमवारी (दि. १८ मे) रोजी या प्रकरणी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास फिर्यादी हे पिंपरी येथील एका स्मारकाच्या पाठीमागील बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानात दारू पिण्यासाठी बसले होते. दारू पिल्यानंतर तिथेच त्यांना झोप लागली. रविवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास उठल्यावर त्यांना आपला मोबाइल आणि हातातील चांदीचे ब्रेसलेट मिळून आले नाही. अज्ञात चोरट्याने ते झोपलेले असताना मोबाइल आणि ब्रेसलेट चोरून नेले. संत तुकाराम नगर पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
मैदानात झोपलेल्या तरुणाचा मोबाइल आणि ब्रेसलेट चोरी
