पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – अवैधरित्या गांजा विक्री करण्यासाठी बाळगणाऱ्या एका तरुणाला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी (दि. १८ मे) रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास नवलाख उंब्रे येथील एमआयडीसी रोडवर करण्यात आली.
पोलीस शिपाई सदानंद रुद्राक्षे यांनी सोमवारी (दि. १८ मे) रोजी या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तेजस कैलास पडवळ (वय २५, रा. नवलाख उंब्रे, ता. मावळ, जि. पुणे) याला अटक केली असून त्याच्यासह राहुल मचले याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास आरोपी तेजस हा विक्रीसाठी आपल्या ताब्यात गांजा बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २७,९०० रुपये किमतीचा ३५८ ग्रॅम गांजा आणि एक मोबाईल फोन हस्तगत करण्यात आला आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक
