पत्नीशी फोनवर बोलतो म्हणून तरुणावर चाकू हल्ला

पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – “माझ्या पत्नीशी फोनवर का बोलतोस” असे विचारून एकाने तरुणावर चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी (दि. १७ मे) रोजी रात्री १०.३५ वाजण्याच्या सुमारास विकासनगर, किवळे येथील सनव्हीव अपार्टमेंटमध्ये घडली.
निलेश बाबासाहेब साठे (वय ३४, विकासनगर, किवळे) यांनी सोमवारी (दि. १८ मे) रोजी या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विक्रांत काशीनाथ कुसळे (वय ३१, रा. विकासनगर, किवळे) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी एकाच इमारतीत राहतात. रविवारी रात्री फिर्यादी टेरेसवर गेले असताना तिथे आरोपी विक्रांत आला. त्याने फिर्यादीला आपल्या पत्नीशी फोनवर बोलण्यावरून जाब विचारला. त्यानंतर त्याने सोबत आणलेल्या चाकूने फिर्यादीच्या डाव्या मांडीवर आणि पोटाच्या डाव्या बाजूला वार करून त्यांना गंभीर जखमी केले. देहूरोड पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *