Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

प्राधिकरणातील ‘त्या’ निष्पाप महिलेच्या बळीनंतर महापालिकेला जाग!

By Team News Beez
May 19, 2026 2 Min Read
0

अनधिकृत केबल्सविरोधात ३० दिवसांचा अल्टिमेटम; थेट कारवाईचा इशारा

​पिंपरी-चिंचवड ः
प्राधिकरण परिसरात एका निष्पाप महिलेचा अनधिकृत आणि लोंबकाळणाऱ्या केबल्समुळे नाहक बळी गेल्यानंतर
अखेर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला जाग आली आहे. या भीषण दुर्घटनेनंतर खडबडून जागी झालेल्या महापालिका प्रशासनाने शहरातील अनधिकृत इंटरनेट आणि टीव्ही केबल्सच्या जीवघेण्या जाळ्याविरोधात अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. महापालिकेच्या विद्युत खांबांवर विनापरवाना ओढलेल्या या धोकादायक केबल्स हटवण्यासाठी संबंधित ऑपरेटर्सना ३० दिवसांची अंतिम मुदत देण्यात आली असून, मुदतीत कागदपत्रे सादर न केल्यास थेट कडक कारवाई करण्‍याचा इशारा देण्यात आला आहे.

​निष्पापांचा बळी गेल्यानंतरच जाग का? नागरिकांचा संतप्त सवाल
शहरातील रस्त्यांवर इंटरनेट आणि टीव्ही केबल्सचे जाळे अस्ताव्यस्तपणे लोंबकाळत आहे. या केबल्समुळे दुर्घटना घडू शकते, अशी भीती नागरिक वारंवार व्यक्त करत होते. मात्र, प्रशासनाच्या सुस्त कारभारामुळे एका निरापराध महिलेला आपला जीव गमवावा लागला. या दुर्घटनेनंतर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, “कारवाई करण्यासाठी प्रशासनाला कोणाच्या तरी बळीची प्रतीक्षा असते का?” असा जळजळीत सवाल विचारला जात आहे. या वाढत्या जनक्षोभाची दखल घेत विद्युत विभागाने आता सर्व बेकायदेशीर केबल चालकांना फैलावर घेतले आहे.
​
“विद्युत खांबांवरील केबल्स म्हणजे थेट अतिक्रमण!”
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार, महापालिकेच्या परवानगीशिवाय विद्युत खांबांचा व्यावसायिक वापर करणे हा कायदेशीर गुन्हा असून, हे महापालिकेच्या मालमत्तेवरील अतिक्रमण मानले जाते. या अनधिकृत केबल्समुळे पालिकेच्या विद्युत व्यवस्थेचे अतोनात नुकसान होत असून सार्वजनिक सुरक्षितता धोक्यात आली आहे.
​
स्मार्ट सिटीच्या ‘डक्ट’चा वापर करणे बंधनकारक
​महापालिकेने स्पष्ट केले आहे की, यापुढे शहरात कुठेही ओव्हरहेड (हवेत लोंबकळणाऱ्या) केबल्स टाकण्यास परवानगी दिली जाणार नाही. केबल चालवण्यासाठी ‘आकाशचिन्ह व परवाना विभागा’ची रितसर परवानगी आवश्यक असून, पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीअंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या ‘ऑप्टिकल फायबर केबल’ नेटवर्कचा (अंडरग्राउंड डक्ट) वापर करणे बंधनकारक राहील.
​
…तर महापालिका केबल्स कापून टाकणार; पाहा कोणती कागदपत्रे आहेत आवश्यक:
​विद्युत विभागाने सर्व इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स (ISPs) आणि केबल ऑपरेटर्सना पुढील ३० दिवसांत महापालिका मुख्य कार्यालयातील विद्युत विभागात (पहिला मजला) खालील कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत:
​वैध व्यावसायिक परवाना, एमएसएमई (MSME) व जीएसटी (GST) प्रमाणपत्र, केबल ऑपरेटरचे नाव, संपर्क, स्थानिक कार्यालयाचा पत्ता आणि शॉप अ‍ॅक्ट लायसन्स, ऑपरेटरचे केवायसी (KYC) तपशील (पॅन कार्ड/ओळखपत्र माहिती/इतर वैधानिक कागदपत्रे), कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेचे नियम पाळण्यासंदर्भातील स्टॅम्प पेपरवरील हमीपत्र, ओव्हरहेड किंवा अंडरग्राउंड केबल्सची मार्गिका (Route) आणि एकूण लांबीचा तपशील, यापूर्वी महापालिकेला शुल्क भरले असल्यास त्याच्या पावतीची छायांकित प्रत, केबल टाकण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने दिलेल्या पूर्वपरवानगीची प्रत

​ग्राहकांनो काळजी घ्या; केबल बंद पडल्यास महापालिका जबाबदार नाही!
​निर्धारित ३० दिवसांच्या मुदतीत ज्या ऑपरेटर्सनी कागदपत्रांची पूर्तता केली नाही, त्यांच्या सर्व केबल्स अतिक्रमण विभागामार्फत थेट कापून जप्त केल्या जातील. या धडक कारवाईमुळे जर नागरिकांचे इंटरनेट किंवा टीव्ही चॅनेल्स बंद पडले, तर त्याला महापालिका प्रशासन जबाबदार राहणार नाही, त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित केबल ऑपरेटरचीच असेल, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे. महापालिकेच्या या आक्रमक भूमिकेमुळे विनापरवाना केबल चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Tags:

Municipal Corporation
Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

पत्नीशी फोनवर बोलतो म्हणून तरुणावर चाकू हल्ला

Next

पुणे शहरातील ‘मगरपट्टा’ हॉटस्पॉट; पिंपरी-चिंचवडकरांना मात्र काहीसा दिलासा!

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग
  • बालमजुरी प्रकरणी बेकरी मालकावर गुन्हा दाखल
  • दुचाकीवरून दारूची वाहतूक; महिलेस अटक

CATEGORIES

  • Uncategorized (439)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (877)
  • पुणे (134)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग
July 23, 2026

Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पुणे : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून वडीवळे...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पुणे : राजगड (वेल्हा) तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे माळवडी–जोगवडी–भुतुंडे–बालवड–शेनवड या प्रमुख मार्गावरील बालवड येथे...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविणाऱ्या महत्त्वाकांक्षी नाशिक फाटा–खेड दुहेरी उन्नत कॉरिडॉर...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

बालमजुरी प्रकरणी बेकरी मालकावर गुन्हा दाखल

Sumedh Chapalgaonkar

​पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – एका बेकरीत बालमजुराला कामावर ठेवल्‍याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

दुचाकीवरून दारूची वाहतूक; महिलेस अटक

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्या एका महिलेला दारूबंदी पथकाने...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

बँक खाते वापरण्‍यास देऊन ११ लाखांची सायबर फसवणूक

Sumedh Chapalgaonkar

​पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – बँक खाते उघडून संघटित सायबर गुन्हेगारी टोळीला फसवणुकीचे पैसे स्वीकारण्यासाठी...

Read More
July 23, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme