पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – मुंबई-बेंगलोर जुन्या महामार्गावर किवळे ब्रिजजवळ सार्वजनिक रस्त्यावर वेश्या व्यवसायाच्या उद्देशाने अश्लील अंगविक्षेप करून सार्वजनिक शांतता व सभ्यतेचा भंग करणाऱ्या दोन महिलांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. १९ मे) रोजी दुपारी सव्वाएक वाजण्याच्या सुमारास द्वारका लॉजसमोरील सार्वजनिक रस्त्यावर करण्यात आली.
याप्रकरणी पोलीस हवालदार बाबासाहेब पांडुरंग क्षीरसागर (वय ४२) यांनी मंगळवारी (दि. १९ मे) रोजी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन महिला आरोपींवर अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम (PITA) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलांनी मंगळवारी दुपारी सव्वाएक वाजताच्या सुमारास मुंबई-बेंगलोर जुन्या हायवेवर किवळे ब्रिजजवळ सार्वजनिक रस्त्यावर उभ्या राहून वेश्या व्यवसायाच्या उद्देशाने येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना अडथळा निर्माण होईल असे कृत्य केले. त्या लैंगिक हावभाव आणि शब्दांचा वापर करून सार्वजनिक शिष्टाचाराचा भंग करत असताना पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास देहुरोड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार बांबळे करत आहेत.
अश्लिल चाळे करणाऱ्या दोन महिलांवर कारवाई
