पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – देहुरोड येथील जुन्या मुंबई-बेंगलोर हायवेवर लेखा फार्मजवळ सार्वजनिक रस्त्यावर उभे राहून वेश्या व्यवसायासाठी ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. १९) दुपारी सव्वाचार वाजेच्या सुमारास स्वर्ग लॉजसमोरील रस्त्यावर करण्यात आली.
याप्रकरणी पोलीस शिपाई समाधान विष्णू पटावकर (वय २९) यांनी मंगळवारी (दि. १९ मे) रोजी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन महिला आरोपींविरुद्ध अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी सव्वाचार वाजताच्या सुमारास आरोपी महिलांनी सार्वजनिक रस्त्यावर वेश्या व्यवसाय करण्याच्या उद्देशाने लैंगिक हावभाव केले आणि शब्दांचा उच्चार करून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण केला. सार्वजनिक शिष्टाचाराचा व सभ्यतेचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार क्षीरसागर करत आहेत.
देहुरोड येथे अश्लील हावभाव करणाऱ्या दोन महिला पोलिसांच्या जाळ्यात
