पुणे रेल्वे स्थानकाजवळ प्रतिबंधित वन्यजीव प्रजाती जप्त ,2 जणांना अटक पुणे विभागीय महसूल संचालनालयाची कारवाई

पुणे, 20 मे 2026 : विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत महसूल गुप्तचर संचालनालय, पुणे प्रादेशिक युनिटच्या अधिकाऱ्यांनी पुण्यात प्रतिबंधित वन्यजीव प्रजातींचा बेकायदेशीरपणे ताबा आणि विक्रीचा प्रयत्न करणाऱ्या दोन व्यक्तींना ताब्यात घेतले आहे
महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी पाळत ठेवून एका संशयिताला 20.05.2026 रोजी पुणे रेल्वे स्थानका जवळ ताब्यात घेऊन. तपासणी केली असता त्याच्याजवळ जाळीच्या पिंजऱ्यात लपवलेले तीन जिवंत शेकरू (रतुफा इंडिका)आढळून आले
त्यानंतर अधिक चौकशी केली असता महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना पुण्यातील दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आले, जिथे दुसऱ्या संशयिताला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातून सात जिवंत भारतीय स्टार कासव (जिओचेलोन एलिगेंस) जप्त करण्यात आले आहेत
शेकरू हे वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972 च्या अनुसूची 1 अंतर्गत सूचीबद्ध आहेत आणि कायद्यांतर्गत परवानगी दिल्याशिवाय त्यांची शिकार आणि व्यापार करण्यास प्रतिबंध आहे. भारतीय स्टार कासवांना वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972 च्या अनुसूची 1 अंतर्गत सूचीबद्ध केले गेले आहे, त्यांनुसार त्यांच्याहि शिकार, ताबा, वाहतूक आणि व्यापारावर बंदी आहे.
वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 अंतर्गत पुढील कायदेशीर कारवाईसाठी , सुटका करण्यात आलेल्या वन्यजीवांसह दोन व्यक्ती आणि लपविण्यासाठी वापरण्यात येणारे पॅकिंग साहित्य वनविभाग, पुणे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *