ज्वेलरीच्या दुकानातून पैंजण चोरणाऱ्या तीन महिलांना अटक

दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने ज्वेलर्सच्या दुकानात जाऊन चांदीचे पैंजण चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन महिलांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ही घटना बुधवारी (२० मे) सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास बालाजी ज्वेलर्स, शिवाजी चौक, चिखली येथे घडली.

पोलिसांनी निलाबाई बाबू शिंदे (५५), फुलाबाई भानुदास ढोकळे (६०) आणि इंदाबाई दिलीप ढोकळे (६०, तिघीही रा. नागेवाडी, जि. जालना) यांना अटक केली आहे. या प्रकरणी सुनील जवाहरलाल पवार (३२, चिंचवडे नगर, चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलांनी चिखली येथील बालाजी ज्वेलर्समध्ये प्रवेश केला. त्यांनी दुकानातील ५० हजार रुपये किमतीचे १८० ग्रॅम वजनाचे चांदीचे तीन पैंजण लबाडीने चोरण्याचा प्रयत्न केला. दुकानदाराच्या सतर्कतेमुळे हा चोरीचा प्रयत्न फसला आणि महिलांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. चिखली पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *