कुत्र्यांना बिस्किट देण्यावरून वाद; महिलेला मारहाण

रस्त्यावरील कुत्र्यांना बिस्किटे आणि खाणे देण्यावरून झालेल्या वादातून एका महिलेला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. ही घटना बुधवारी (२० मे) मध्यरात्री १२.०५ वाजताच्या सुमारास संतपीठ रोड, पाटीलनगर, चिखली येथे घडली.

जयश्री भोसले (३५) आणि रामदास भोसले (दोघेही रा. चिखली) यांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी एका महिला फिर्यादीने चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला संतपीठ रोडवर कुत्र्यांना बिस्किटे आणि चिकन राईस खायला घालत होत्या. त्यावेळी तिथे राहणाऱ्या आरोपींनी “तू इथे कुत्र्यांना काही खायला टाकू नको” असे म्हणून वाद घातला. वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. यावेळी रामदास भोसले यांनी फिर्यादीच्या हातातील लोखंडी रॉड हिसकावून त्यांच्या हातापायावर मारला, तर जयश्री भोसले यांनी हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. चिखली पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *