आळंदी येथील ज्ञानेश्वर महाराज मंदिरात दानपेटीतील पैशांचा कर्मचाऱ्याकडून अपहार, आळंदी पोलिसांत गुन्हा दाखल

श्री क्षेत्र आळंदी येथील ज्ञानेश्वर महाराज मंदिर परिसरात कर्मचाऱ्याकडूनच दानपेटीतील पैशांचा अपहार करण्याची धक्कादायक घटना समोर आली असून, भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या पैशांचा अशाप्रकारे अपहार झाल्यामुळे वारकरी संप्रदाय आणि भाविकांकडून तीव्र नाराजीची व्यक्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार,मंदिरातील कर्मचारी विशाल बाळू वाळके, ( वय ३३ चोवीसावाडी ता. हवेली जिल्हा पुणे) याने दानपेटीतील पैसे काढताना नजर चुकवून काही रक्कम स्वतःच्या खिशात टाकली त्यानंतर फुलांच्या हाराच्या ट्रे मध्ये ठेवून कॅशियर कडे जात असल्याचे भासवून रकमेचा परस्पर अपहार करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे , सदर प्रकार हा दिनांक १२में, १३मे आणि ,१६ में रोजी घडला असून ह्यात एकूण १५ हजार रुपयांचा अपहार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले असून फिर्यादी ज्ञानेश्वर महादेव वीर, व्यवस्थापक ,श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी देवाची,यांनी आळंदी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे .आळंदी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून. आरोपीची कसून चौकशी सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.तर मंदिरातील आर्थिक व्यवहार सुव्यवस्थित आणि अधिक पारदर्शक ठेवण्याची मागणी भाविकांकडून करण्यात येत आहे.

आळंदी त चर्चा..
गुन्हा दाखल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात कॅश सापडली असल्याची चर्चा संपूर्ण आळंदी मध्ये रंगली असून आता पोलीस चर्चे वरून तपास करतील का ?अशी ही चर्चा रंगली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *