विनायक दामोदर अभ्यंकर हे तळेगाव येथील कलापिनी संस्थेचे अध्यक्ष होते तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणूनही त्यांची ओळख होती, मागील काही दिवसापासून त्यांच्यावर पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते , आज दि 23 मे रोजी सायंकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली, विनायक दामोदर अभ्यंकर यांचा ,विविध सामाजिक तसेच राजकीय उपक्रमांत सहभाग असल्याने त्यांच्या निधनाने तळेगाव परिसरातील सामाजिक, शैक्षणिक,धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय अशा सर्वच क्षेत्रांवर शोककळा पसरली असून, त्यांच्या निधनाने ने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.
अभ्यंकर यांनी विविध सामाजिक संस्थांमध्ये सक्रीय सहभाग नोंदवत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले,ते ब्राम्हण सर्व सेवा संघाचे आजीव सदस्य होते, तसेच काही काळ त्यांनी शिक्षण मंडळाचे सदस्य म्हणूनही काम पाहिले होते
तळेगाव येथील ज्येष्ठ उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते विनायक दामोदर अभ्यंकर (वय62) यांचे अल्पशा आजाराने निधन
