पती-पत्‍नीवर शेजाऱ्यांचा हल्ला; महिलेचा दात पडला

​पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – घर सावकाश रंगवण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरून शेजाऱ्यांनी पती-पत्नीला बांबू आणि दगडाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत महिलेचा दात पडला आहे. ही घटना मुळशी तालुक्यातील नेरे दत्तवाडी येथे रविवारी (दि. २४ मे) रोजी रात्री सव्‍वादहा वाजताच्‍या सुमारास घडली.
नंदकिशोर मिश्रा (वय २८, रा. ढमाले नगर, नेरे दत्तवाडी) आणि त्याच्या मेव्हण्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोकुळ भागवत कुंभार (वय ४३, रा. नेरे दत्तवाडी, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आरोपीला घराचा रंग सावकाश द्यावा असे सांगितले होते. यावरून आरोपी संतापले. त्यांनी शिवीगाळ करत गोकुळ कुंभार आणि त्यांच्या पत्नीवर लाकडी बांबू व दगडाने हल्ला केला. या मारहाणीत दोघेही जखमी होऊन महिलेचा दात पडला. तसेच तिच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटले. हिंजवडी पोलीस ठाण्‍यातील सहाय्यक निरीक्षक वांगणेकर करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *