काळुस गावात ‘तिरट’ जुगार अड्ड्यावर छापा; चौघांवर गुन्हा

​पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – ‘तिरट’ नावाचा जुगार खेळणाऱ्या चौघांवर उत्तर चाकण पोलिसांनी छापा टाकून गुन्‍हा दाखल केला. ही कारवाई सोमवारी (दि. २५ मे) रोजी रात्री पावणेदहा वाजताच्‍या सुमारास करण्‍यात आली.
संभाजी पोटवडे (वय ४५), परमेश्वर पवळे (वय २९), संतोष पोटवडे (वय ३०) आणि ज्ञानेश्वर पवळे (वय ३७, सर्व रा. काळुस, ता. खेड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई महेश कोळी यांनी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळुस गावात काही जण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला. आरोपी एका लाइटच्या उजेडात गोलाकार बसून तिरट जुगार खेळताना आढळले. पोलिसांनी त्यांच्याकडून पत्ते आणि तीन हजार ५० रुपये रोख जप्त केले. पुढील तपास पोलीस हवालदार ढमढेर करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *