Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पुणे

आळंदी येथील ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील दानपेटी रक्कम अपहार प्रकरणात ,चार जणांना चौकशी नोटीस जारी, देवस्थान कोणालाही पाठीशी घालणार नाही, पालखी सोहळा प्रमुख, ॲड.राजेंद्र उमाप,यांचे पत्रकार परिषदेत आश्वासन

By Team News Beez
May 26, 2026 3 Min Read
0

आळंदी:

माऊली मंदिरातील देणगी पेटीतील रकमेचा अपहार झाल्याचे निदर्शनास आल्या नंतर आळंदी संस्थाननी तात्काळ संबंधित आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यास तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे आळंदी संस्थान या प्रकरणी कोणालाही पाठीशी घालणार नसल्याचे पालखी सोहळा प्रमुख ॲड राजेंद्र उमाप यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. माऊली मंदिरातील भक्त निवासात आयोजित पत्रकार परिषदेत मंदिरातील वारुळे घटने बाबत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेस प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे, पुरुषोत्तम महाराज पाटील, व्यवस्थापक माऊली वीर, आळंदी ग्रामस्थ पदाधिकारी नंदकुमार कुऱ्हाडे पाटील, डी. डी. भोसले पाटील, विलास घुंडरे पाटील, रामदास भोसले, संकेत वाघमारे आदी उपस्थित होते. ॲड उमाप म्हणाले, आळंदी संस्थान कोणालाही याप्रकरणी पाठीशी घालणार नाही इतर चार जणांवर खुलासा करण्यासाठी नोटिसा देण्यात आले आहेत यामध्ये व्यवस्थापक व्यवस्थापक उपव्यवस्थापक लेखापाल आणि अन्नदान विभाग प्रमुख यांचा समावेश आहे त्यांच्याकडून खुलासा प्राप्त झाल्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे माऊली मंदिरातील कर्मचारी सेवक यांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यात येणार असून सुरक्षा व्यवस्था, कर्मचारी सेवा या बाबत कडक नियमावली संस्थानने जाहीर केली असून प्रभावी उपाय योजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या अपहार प्रकरणी विशाल वारुळे यांने विविध विभागात काम करीत असताना संबंधित विभागातील कर्मचारी, सेवक यांचा विश्वास संपादन करून काम केले. त्याची नेमणूक या साठी विश्वस्तांनी शिफारस केली नसल्याचे विश्वस्तांनी सांगितले. वारुळे याने केलेल्या कामामुळे त्याला मदतीस घेण्यात आले होते. तो देवस्थानचा कर्मचारी नव्हता. त्याने अन्नदान विभाग, पालखी सोहळा काळात आचारी म्हणून काम केले होते. त्यामुळे कोणालाही शंका आली नाही. मात्र सीसीटीव्ही फुटेज तपासात त्याचेवर संशय आल्याने तक्रार देऊन त्याचेवर देणगी पेटी तील रकमेचा अपहार केल्याचा गुन्हा देवस्थानने केलेल्या तक्रारी वरूनच दाखल झाल्याचे ॲड उमाप यांनी सांगितले. संशयास्पद हालचाल निदर्शनात असल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात देवस्थान कोणालाही पाठीशी घालणार नाही. अजून कोणी या प्रकरणात आढळून आल्यास त्यांचेवर देखील कडक कारवाई केली जाईल अशी ग्वाही ॲड उमाप यांनी पत्रकार परिषदेतून भाविक, नागरिक भक्तांना दिली. तो पगारा शिवाय कामकाज करीत होता. या प्रकरणी देवस्थानने आता कडक भूमिका घेतली असून सेवक, कर्मचारी यांच्यासाठी नियमावली तयार केली असून सर्वांवर कडक नजर ठेवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. संशयास्पद हालचाल निदर्शनात असल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात देवस्थान कोणालाही पाठीशी घालणार नाही. अजून कोणी या प्रकरणात आढळून आल्यास त्यांचेवर देखील कडक कारवाई केली जाईल अशी ग्वाही ॲड उमाप यांनी पत्रकार परिषदेतून भाविक, नागरिक भक्तांना दिली. तो पगारा शिवाय कामकाज करीत होता. या प्रकरणी देवस्थानने आता कडक भूमिका घेतली असून सेवक, कर्मचारी यांच्यासाठी नियमावली तयार केली असून सर्वांवर कडक नजर ठेवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सेवक विशाल वारुळे यांच्या विरोधात संशय व्यक्त झाल्याने सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. या मुळे अधिक संशय वाढल्याने पोलिसांत तक्रार करून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे ॲड उमाप यांनी सांगितले. या घटनेमुळे मंदिरातील सुरक्षा व्यवस्था, प्रवेश व्यवस्था अधिक कडक करण्याचा निर्णय दक्षता म्हणून घेण्यात आला आहे. मंदिरात कर्मचारी, सेवेकरी व सुरक्षा रक्षकांना ओळखपत्र बंधनकारक केले आहे. मंदिरात येण्या-जाण्यास प्रवेशद्वाराचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. येजा करताना सर्वांची तपासणी सुरक्षा रक्षकां कडून केली जाणार आहे. तसेच मंदिर परिसरात सर्व प्रकारच्या पिशव्या किंवा संशयास्पद वस्तू आणण्यास निर्बंध जारी केले आहेत. दानपेटी देणगी रक्कम मोजणी प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी आधुनिक सॉफ्टवेअर प्रणाली, अत्याधुनिक सीसीटीव्ही व्यवस्था, एआय तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. चा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्मचारी, सेवेकऱ्यांची हजेरी डिजिटल ट्रॅकिंग प्रणालीने घेण्यात येईल. यासाठी नियोजन होत असल्याचे ॲड उमाप यांनी सांगितले.

Tags:

Adv. Rajendra Umap
Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

पिंपरी-चिंचवडकरांचा डिजिटल करभरणेला जोरदार प्रतिसाद; अवघ्या ५६ दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत २३० कोटी!

Next

​इंग्रजी शाळांच्या झगमगाटात जिल्हा परिषद शाळा पडल्या मागे; पटसंख्येसाठी गुरुजींची गावोगावी धावपळ

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग
  • बालमजुरी प्रकरणी बेकरी मालकावर गुन्हा दाखल
  • दुचाकीवरून दारूची वाहतूक; महिलेस अटक

CATEGORIES

  • Uncategorized (439)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (877)
  • पुणे (134)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग
July 23, 2026

Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पुणे : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून वडीवळे...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पुणे : राजगड (वेल्हा) तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे माळवडी–जोगवडी–भुतुंडे–बालवड–शेनवड या प्रमुख मार्गावरील बालवड येथे...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविणाऱ्या महत्त्वाकांक्षी नाशिक फाटा–खेड दुहेरी उन्नत कॉरिडॉर...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

बालमजुरी प्रकरणी बेकरी मालकावर गुन्हा दाखल

Sumedh Chapalgaonkar

​पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – एका बेकरीत बालमजुराला कामावर ठेवल्‍याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

दुचाकीवरून दारूची वाहतूक; महिलेस अटक

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्या एका महिलेला दारूबंदी पथकाने...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

बँक खाते वापरण्‍यास देऊन ११ लाखांची सायबर फसवणूक

Sumedh Chapalgaonkar

​पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – बँक खाते उघडून संघटित सायबर गुन्हेगारी टोळीला फसवणुकीचे पैसे स्वीकारण्यासाठी...

Read More
July 23, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme