पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – मावशीच्या मुलाच्या लग्नाला जाण्याच्या कारणावरून दोन सख्ख्या भावांनी मिळून आपल्याच मोठ्या भावाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना चिखली येथील भीमशक्ती नगरमध्ये सोमवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली.
निकेश बाबासाहेब वाघमारे आणि महेश बाबासाहेब वाघमारे यांना पोलिसांनी अटक केली आहे. या मारहाणीबाबत प्रमोद बाबासाहेब वाघमारे (वय ३६, तिघेही रा. भीमशक्ती नगर, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कामावरून घरी आले असता लग्नाला जाण्याच्या कारणावरून आरोपी भावांनी वाद घालून मारहाण केली. यात फिर्यादीच्या खालच्या दाताच्या हिरडीला गंभीर जखम होऊन २ टाके पडले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार काळोखे करीत आहेत.
लग्नाला जाण्याच्या कारणावरून भावांमध्ये हाणामारी
