पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – मुलीची कागदपत्रे आणण्यासाठी गेलेल्या सासऱ्याला आणि त्यांच्या लहान मुलीला जावई व त्याच्या भावाने मिळून कुकर व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना खेड तालुक्यातील वासोली येथे सोमवारी (दि. २५ मे) रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली आहे.
रवी धर्माजी सावळे (वय ३८) आणि अतुल धर्माजी सावळे (वय ३०, दोघेही रा. वासोली, ता. खेड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तात्याराव बाबाराव तायडे (वय ४८, रा. वासुली फाटा; मूळ रा. वाशिम) यांनी उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची मुलगी प्रिती ही आधारकार्ड आणायला गेली असता जावयाने वाद घातला. त्यानंतर मध्यस्थी करायला गेलेल्या फिर्यादीच्या डोक्यात जावयाने कुकर मारून जखमी केले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक जुंदरे करीत आहेत.
कौटुंबिक वादातून सासरे व मेहुणीला कुकर मारहाण
