Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

पिंपरी-चिंचवड

इंधन कंपन्यांचा कोट्यवधींचा तोटा; टप्प्याटप्प्याने आणखी ९ रुपयांपर्यंत दरवाढीची शक्यता

By Team News Beez
May 28, 2026 1 Min Read
0

पेट्रोल-डिझेल दरवाढीची चाहूल; पिंपरी-चिंचवडकरांचे आर्थिक गणित बिघडणार!

पिंपरी-चिंचवड :
महागाईने आधीच सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना आता पेट्रोल-डिझेल दरवाढीची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तब्बल ६ ते ९ रुपयांची वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील लाखो वाहनधारकांच्या खिशाला मोठी कात्री बसण्याची चिन्हे आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार आणि वाढत्या आर्थिक ताणामुळे सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्या अडचणीत सापडल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, कंपन्यांना सध्या दररोज सुमारे ५५० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. हा भार वाढत चालल्याने इंधन दरवाढ अटळ मानली जात आहे.
दरम्यान, नागरिकांचा रोष टाळण्यासाठी दरवाढ एकाचवेळी केली जाणार नसल्याची माहिती समोर येत आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर टप्प्याटप्प्याने वाढवण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दर काही दिवसांनी किरकोळ वाढ करून कंपन्या नुकसान भरून काढण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.

पिंपरी-चिंचवड हे औद्योगिक आणि आयटी क्षेत्रातील महत्त्वाचे शहर मानले जाते. हिंजवडी आयटी पार्क, चाकण आणि भोसरी एमआयडीसी परिसरात कामासाठी लाखो कर्मचारी रोज प्रवास करतात. दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर अवलंबून असलेल्या नोकरदार वर्गाला या संभाव्य दरवाढीचा मोठा फटका बसणार आहे.
शहरातील रिक्षाचालक, कॅब चालक, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आणि मालवाहतूक क्षेत्रातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. इंधन खर्च वाढल्यास वाहतूक दर वाढतील. त्याचा थेट परिणाम बाजारातील दरांवर होण्याची शक्यता आहे.

भाजीपाला, दूध, किराणा, अन्नधान्य आणि अन्य जीवनावश्यक वस्तू आणखी महागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आधीच वाढत्या महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांना आता आणखी आर्थिक ताण सहन करावा लागू शकतो.

“पगार तेवढाच आणि खर्च मात्र रोज वाढतोय. सामान्य माणसाने जगायचे कसे?” असा सवाल आता शहरातून विचारला जात आहे. पेट्रोलियम कंपन्यांकडून अधिकृत घोषणा कधी होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

मावळातील ग्रामीण भागात ईद-उल-अजहा उत्साहात ईदगाह मैदानात हजारो मुस्लिम बांधवांचे सामुदायिक नमाज पठण

Next

पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट संघटनेचे संस्थापक कार्याध्यक्ष रोहीदास कोंडे यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर !!

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग
  • बालमजुरी प्रकरणी बेकरी मालकावर गुन्हा दाखल
  • दुचाकीवरून दारूची वाहतूक; महिलेस अटक

CATEGORIES

  • Uncategorized (439)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (877)
  • पुणे (134)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme