पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट संघटनेचे संस्थापक कार्याध्यक्ष रोहीदास कोंडे यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर !!

दुसऱ्या ‘पिंपरी चिंचवड प्रिमीअर लीग‌’ टी-२० क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ ३१ मे रोजी !!

सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंचा गौरव समारंभ !!

पुणे, २८ मेः पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्यावतीने पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट संघटनेचे संस्थापक कार्याध्यक्ष रोहीदास कोंडे यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसेच राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या मुले आणि मुलींचा सत्कार समारंभ तसेच दुसऱ्या “पिंपरी चिंचवड प्रिमीअर लीग‌’ (पीसीपीएल) टी-२० क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ ३१ मे रोजी रामकृष्ण हॉटेल, रावेत, बी आर टी रोड येथे आयोजित करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना संघटनेचे अध्यक्ष जगदीश शेट्टी आणि सचिव राजू कोतवाल यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड शहरामध्ये तसेच क्रिडा क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी आणि विकासासाठी उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल आणि पिंपरी चिंचवड शहराचे माजी अतिरिक्त आयुक्त आणि संघटनेचे संस्थापक कार्याध्यक्ष श्री. रोहीदास कोंडे यांना ‘जीवन गौरव पुरस्कार‌’ देण्यात येणार आहे. मावळचे खासदार मा. श्रीरंग अप्पा बारणे यांच्या हस्ते ३१ मे रोजी हा समारंभ होणार आहे.

“पिंपरी चिंचवड प्रिमीअर लीग‌’ (पीसीपीएल) टी-२० क्रिकेट स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभही यावेळी होणार असून स्पर्धेतील १२ मुले आणि मुलींचा गौरवही यावेळी करण्यात येणार आहे. इशा घुले, नीती अगरवाल, सहेज कौर, श्रेया तरस, ईश्वरी अवसरे, श्रेया जगदाळे, ऋतुजा गिलबिले, अभिनव देसाई, चैतन्य कोंडभार, प्रज्वल पवार, वेदांता कानपिळे, इंद्रजीत शिंदे आदि खेळाडूंचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *