पिंपरी, दि. २९ (प्रतिनिधी) – लग्नापूर्वीच्या नावाचा आणि वैयक्तिक कागदपत्रांचा गैरवापर करून पत्नीची फसवणूक करण्यात आली. ही घटना सप्टेंबर २०२१ ते डिसेंबर २०२१ या दरम्यान अॅक्सीस बँक, हिंजवडी येथे घडली.
या प्रकरणी फसवणूक झालेल्या महिलेने गुरुवारी (दि. २८ मे) रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संदेश शशीकांत आंब्रो (रा. काळेवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदेश याने पत्नी फिर्यादीचा विश्वास संपादन करून मॉरगेज लोनसाठी त्यांच्या लग्नापूर्वीच्या नावाचा वापर केला. पत्नीला कोणतीही कल्पना न देता त्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून त्यांना सह-भागीदार बनवले. आरोपीने बँकेच्या कागदपत्रांवर खोटी सही करून स्वतःच्या फायद्यासाठी ४१ लाख २५ हजार ७८८ रुपयांचे कर्ज घेतले. याबाबत विचारणा केली असता आरोपीने पत्नीला शिवीगाळ केली. हिंजवडी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
पत्नीच्या नावाचा गैरवापर करत ४१ लाखांची फसवणूक
