लून हिंजवडीतील IT कंपनीला अचा*सातशे कर्मचाऱ्यांचे भवितव्य अंधारात ढकनक टाळे,कर्मचारी हवालदिल तर IT क्षेत्रात खळबळ*

आय टी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी येथील ‘थिंक टेक्नॉलॉजी इंडिया'( Thynk Tecnology India) ह्या कंपनीला कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक बंद करण्यात आल्याने सातशे कर्मचाऱ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कंपनी मध्ये इंजिनियर्स सोबत मोठ्या प्रमाणात फ्रेशर्स आणि इंटर्न्स हि कामाला असल्याने एकाच रात्रीत शेकडो लोक बेरोजगार झाले आहेत.
कंपनी मध्ये गेल्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणावर नोकरभरती करण्यात आली होती, सुरुवातीला इंटर्न्सना वेळेवर 15000 मानधन देऊन कंपनीकडून त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला, मात्र फेब्रुवारी महिन्यापासून कर्मचाऱ्यांचे पगार रखडण्यास सुरुवात झाली, त्यानंतर कर्मचाऱ्यांनी कंपनीला जाब विचारला असता कंपनीचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भानुदास ठाकरे आणि एच आर विभागाने इमेल द्वारे ” इंटर्नल ऑडिट” सुरू असल्याचे कारण पुढे केले, आणि 25 ते 28 फेब्रुवारी पर्यंत सर्व थकीत पगार तसेच मानधन दिले जाईल असे आश्वासनही देण्यात आले, मात्र दिलेली तारीख उलटून गेल्यावरही कर्मचाऱ्यांचे पगार न झाल्याने , त्यांनी कंपनीवर दबाव वाढवला असता, त्यांना पगाराचे धनादेश देण्यात आले, दुर्दैवाने हे सर्व धनादेश न वटल्याने कर्मचाऱ्यांचे मासिक हप्ते, तसेच दैनंदिन खर्चाचा प्रश्न निर्माण झाल्याने कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
ह्या संपूर्ण प्रकारा मागे मोठा आर्थिक घोटाळा असण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे ,दरम्यान फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज ( FITE) या आयटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने प्रकरणाची दखल घेतली असून, कंपनीने नोकरीवर ठेवताना प्रत्येक फ्रेशर आणि इंटर्न् कडून लॅपटॉप सुरक्षा ठेव म्हणून तब्बल 15000 रुपये रोख किंवा ऑनलाइन स्वरूपात वसूल केले असल्याची धक्कादायक माहिती संघटनेचे अध्यक्ष पवनजीत माने यांनी दिली आहे दरम्यान हि जमा केलेली रक्कम आणि पगार बुडवून कंपनीचे संचालक आता फरार झाले आहेत, इतकेच नाही तर, दिलेले चेक बाऊन्स होण्यासाठी संचालकाने बँकेला चेक बुक हरवल्याचा खोटा ईमेल करून पेमेंट थांबवल्याचा आरोपही कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला आहे, सदर फसवणुकीविरोधात आता पीडित कर्मचारी आणि ‘FITE’ या संघटनेने स्थानिक पोलिस ठाणे तसेच कामगार आयुक्तांकडे तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *