दारूचे बिल भरण्यास नकार दिल्याने टोळक्‍याकडून कामगाराला मारहाण

पिंपरी, दि. २९ (प्रतिनिधी) – दारूचे बिल भरण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून एका टोळक्याने बिगारी काम करणाऱ्या व्यक्तीला मारहाण करून जखमी केले. ही घटना बुधवारी (२७ मे) सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास सचिन वाईन्स, थेरगाव येथे घडली.
मारुती रामधन रुडे (वय ५१, रा. थेरगाव, मूळ – हारू, जि. यवतमाळ) यांनी गुरुवारी (दि. २८ मे) रोजी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दत्ता पाटेकर (वय २५) याला अटक केली असून चंदू आणि त्यांच्या एका अनोळखी मित्रावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला दारूचे बिल भरण्यास सांगितले होते. फिर्यादीने नकार दिल्याने आरोपींनी त्यांना हाताने मारहाण केली. त्यानंतर आरोपी दत्ता याने दारूची रिकामी बाटली फोडून फिर्यादीच्या पाठीवर आणि डाव्या हातावर मारली, ज्यामुळे ते जखमी झाले. काळेवाडी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *