Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

फुगेवाडी विषारी दारू प्रकरणात दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – आमदार शंकर जगताप

By Team News Beez
May 29, 2026 2 Min Read
0

मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेत केली सांत्वना; पोलिसांची बैठक घेऊन दिल्या सूचना

दोषी पोलीस, उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनाही  सोडू नका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आक्रमक मागणी

पिंपरी, २९ मे (प्रतिनिधी): पिंपरी चिंचवड शहरातील फुगेवाडी भागातील संजयनगर परिसरात गुरुवारी आणि शुक्रवारी विषारी दारूमुळे सुमारे दहा जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांनी थेट राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. या संपूर्ण अवैध धंद्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या दोषी पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी आक्रमक मागणी जगताप यांनी केली आहे. दरम्यान पोलिसांची बैठक घेत या प्रकरणी तातडीने कडक पावले उचलावीत अशा सूचना देखील त्यांनी केल्या आहेत.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार शंकर जगताप यांनी शुक्रवारी तातडीने फुगेवाडी येथील संजयनगर परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी मृत सचिन नेटके, अक्षय अवसरमल, विजय राठोड, राजेंद्र राठोड , अकबर पठाण, आणि बाबा शेख  यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या कठीण काळात शासन आणि आम्ही सर्वजण मृतांच्या नातेवाईकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. आगामी काळात या सर्व पीडित कुटुंबीयांना सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा पुरवण्यासोबतच शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. या भागात कोणत्याही रुग्णाला अचानक त्रास झाल्यास त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालय किंवा ‘वायसीएम’ रुग्णालयात दाखल करून उपचार देण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत.
—————————–
रात्री ११ नंतर दुकाने बंद ठेवा; पोलिसांना कडक निर्देश
या घटनेनंतर आमदार जगताप यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीला पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, पोलीस उपायुक्त संदीप आटोळे, सहायक पोलिस आयुक्त विशाल हिरे , सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे, पोलीस निरीक्षक भीमराव कोळी बैठकीला उपस्थित होते  परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी फुगेवाडी परिसरात रात्री ११ नंतर सर्व दुकाने व टपऱ्या सक्तीने बंद ठेवण्यात याव्यात, असे आदेश त्यांनी पोलिसांना दिले. तसेच रात्रीच्या वेळी तरुण मुले विनाकारण बाहेर फिरताना दिसल्यास पोलिसांनी तात्काळ त्यांच्या पालकांना बोलावून याविषयीची माहिती द्यावी व योग्य ती समज द्यावी, अशा कडक सूचना त्यांनी या बैठकीत दिल्या. या गुन्ह्याच्या तपासात कोणतीही चालढकल सहन केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

——–प्रतिक्रिया ————-
फुगेवाडीत घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी  आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला. या अवैध धंद्याला चालविणाऱ्या,  पाठबळ देणाऱ्या किंवा त्याकडे डोळेझाक करणाऱ्या दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जबाबदार कर्मचाऱ्यांवर तातडीने ‘सदोष मनुष्यवधाचा’ गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी, अशी आक्रमक मागणी मी शासनाकडे केली आहे. केवळ दारू विक्रेतेच नव्हे, तर या रॅकेटमधील मूळ सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांना तात्काळ बेड्या ठोकल्या पाहिजेत. बाधित कुटुंबीयांना सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा आणि आवश्यक ती शासकीय मदत मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यापुढे परिसरात रात्री ११ नंतर सर्व दुकाने सक्तीने बंद ठेवण्याचे आणि पोलिसांना रात्रीच्या गस्ती वाढवण्याचे आदेश दिले आहेत. या गुन्ह्याच्या तपासात कोणतीही चालढकल किंवा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, सर्व दोषींना शिक्षा मिळेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही!”

– आमदार शंकर जगताप

(चिंचवड विधानसभा मतदारसंघ)

Tags:

MLA Shankar Jagtap
Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

दारूचे बिल भरण्यास नकार दिल्याने टोळक्‍याकडून कामगाराला मारहाण

Next

चाकण परिसरात १२ लाखांचा गांजा जप्त; तिघांना अटक

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • Delhi-सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर इमरान मसूद यांची टीका; ‘हे अण्णा हजारे पार्ट-2, सर्व काही स्क्रिप्टेड’
  • Mumbai-दादरमधील आंदोलनादरम्यान महिला आंदोलकाशी गैरवर्तनाचा आरोप; व्हायरल व्हिडिओवरून मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण
  • Delhi-जंतर-मंतर आंदोलनात पॅलेट गन वापरली का? सीआरपीएफकडून चौकशी; राहुल गांधींचा गंभीर आरोप
  • Pimpri-Chinchwad-दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईच्या निषेधार्थ नेहरूनगर न्यायालयात वकिलांचे आंदोलन; विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा
  • संवादातून तणाव निवळला : पुणे पोलिसांच्या समन्वयाने हिंदू संघटनांनी आंदोलन मागे घेतले

CATEGORIES

  • Uncategorized (449)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (879)
  • पुणे (135)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • Delhi-सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर इमरान मसूद यांची टीका; ‘हे अण्णा हजारे पार्ट-2, सर्व काही स्क्रिप्टेड’
  • Mumbai-दादरमधील आंदोलनादरम्यान महिला आंदोलकाशी गैरवर्तनाचा आरोप; व्हायरल व्हिडिओवरून मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण
  • Delhi-जंतर-मंतर आंदोलनात पॅलेट गन वापरली का? सीआरपीएफकडून चौकशी; राहुल गांधींचा गंभीर आरोप
July 24, 2026

Delhi-सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर इमरान मसूद यांची टीका; ‘हे अण्णा हजारे पार्ट-2, सर्व काही स्क्रिप्टेड’

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार इमरान मसूद यांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर टीका...

Read More
July 24, 2026
July 24, 2026

Mumbai-दादरमधील आंदोलनादरम्यान महिला आंदोलकाशी गैरवर्तनाचा आरोप; व्हायरल व्हिडिओवरून मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : दादर परिसरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल...

Read More
July 24, 2026
July 24, 2026

Delhi-जंतर-मंतर आंदोलनात पॅलेट गन वापरली का? सीआरपीएफकडून चौकशी; राहुल गांधींचा गंभीर आरोप

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली : 20 जुलै रोजी दिल्लीतील संसद मोर्चादरम्यान झालेल्या पोलिस कारवाईवरून नवा वाद निर्माण...

Read More
July 24, 2026
July 24, 2026

Pimpri-Chinchwad-दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईच्या निषेधार्थ नेहरूनगर न्यायालयात वकिलांचे आंदोलन; विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, २४ जुलै : दिल्ली येथे विद्यार्थ्यांनी विविध शैक्षणिक प्रश्नांबाबत सुरू केलेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस...

Read More
July 24, 2026
July 24, 2026

संवादातून तणाव निवळला : पुणे पोलिसांच्या समन्वयाने हिंदू संघटनांनी आंदोलन मागे घेतले

Sumedh Chapalgaonkar

दिल्लीस्थित *कॉकरोच जनता पक्ष (CJP)* यांच्या पुण्यातील हालचालींमुळे निर्माण झालेल्या संभाव्य तणावाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी...

Read More
July 24, 2026
July 24, 2026

Pimpri-Chinchwad-बँक खात्यांचा गैरवापर करून कोट्यवधी रुपयांचा सायबर घोटाळा पिंपरी-चिंचवड शहरात ६ विविध गुन्हे दाखल

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – विविध बँकांमधील खात्यांचा आणि एटीएमचा गैरवापर करून नागरिकांची लाखो रुपयांची...

Read More
July 24, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme